देशात व्हिज्युअल इफेक्ट्स, अँनिमेशन आणि गेमिंगला प्रोत्साहन देण्यासाठी कृती गटाची स्थापना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात व्हिज्युअल इफेक्ट्स, अँनिमेशन आणि गेमिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं एका कृती गटाची स्थापना केली आहे. हा कृतीगट भारतीय बाजारात क्षमता निर्माणाचे विविध उपाय त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मागणी पूर्ण करण्यासाठी करायच्या उपाययोजनांसंदर्भात सल्ला देणार आहे.

देशाकडे या क्षेत्रात मार्गदर्शन करण्याची क्षमता असून ४० अब्ज डॉलरच्या आंतरराष्ट्रीय बाजारात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होऊन प्रतिवर्षी १ लाख ६० हजार रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतील असंही सरकारनं म्हटलं आहे. या कृतीगटात महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्य सरकार आणि राष्ट्रीय शिक्षण संशोधन परिषद आणि विविध उद्योगांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.