अहमदनगरमधील रंधा धबधबा इथं लवकरच काचेचा पूल तयार करण्यात येणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात पर्यटनविकास प्रकल्पांतर्गत रंधा धबधबा इथं लवकरच काचेचा पूल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी मंजुरी मिळालेल्या ५ कोटींपैकी अडीचकोटी रुपयांचा निधी नुकताच प्राप्त झाल्याची माहिती आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिली.

निसर्गपर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारदरा इथल्या रंधा धबधब्यावर होणारा हा पूल महाराष्टातला पहिला काचेचा पूल असून देशातला सहावा पूल आहे. लवकरच या भागातल्या पर्यटन विकासासाठी विविध प्रकल्प राबवले जाणार असून त्यामध्ये कळसुबाई येथे रोप वे चा समावेश आहे.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image