हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी भाषणं केली जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचं भाजपाकडून खंडन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विविध भागात चिथावणीखोर आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी भाषणं केली जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचं भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी खंडन केलं आहे. या आरोपावरून सरकारला कोंडीत पकडणाऱ्या विरोधी पक्षांचे आरोप निराधार असल्याचं नड्डा यांनी जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

गेल्या आठ वर्षांत भारतीय राजकारणात झपाट्याने बदल झाले असून, मतपेढीचं, फुटीरतावादी राजकारण आणि बुरसटलेला दृष्टिकोन आता कालबाह्य झालं आहे असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास” या मंत्रानुसार कार्य करत असून त्यामुळे प्रत्येक भारतीय सक्षम झाला आहे, असं मत नड्डा यांनी व्यक्त केलं आहे. 

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image