देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट कायम

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या उत्तर, मध्य आणि पश्चिम राज्यांमधे उष्णतेचा प्रकोप जाणवत आहे. राजधानी दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानात तापमान ४० अंशाच्या वर पोचलं आहे.

देशाच्या पश्चिमोत्तर, मध्य आणि पश्चिमी भागातल्या काही जिल्ह्यांमध्ये पुढील ४ दिवस उष्णतेची लाट कायम राहील असं हवामान खात्यानं कळवलं आहे.