चंद्रपूरात आढळला ८०० वर्षापूर्वीचा परमार काळातील प्राचीन लोहखनिज कारखाना

 


मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूरमधल्या घंटाचौकी इथं ८०० वर्षापूर्वीच्या परमार काळातील प्राचीन लोहखनिज कारखाना आढळला आहे. या परिसरात लोखंडी अवजारे बनविण्याच्या ३० भट्ट्या , दगड फोडण्यासाठी लागणारी अवजारे, खनिज असलेले हजारो खडक, लोह तुकडे, मातीचे साचे आणि गाळलेले लोखंड मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. हा लोह कारखाना ११/१२ व्या शतकातल्या परमार राजांच्या काळातला असल्याचा दावा पुरातत्व अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी केला आहे.