प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांच्यात द्वीपक्षीय चर्चा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. या द्द्विपक्षीय चर्चेत प्रधानमंत्री मोदी दोन्ही देशातील परस्पर सहकार्याच्या क्षेत्रातील अंमलबजावणीचा आढावा घेतला. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.

जॉन्सन यांचा दोन दिवसीय भारत दौरा कालपासून सुरु झाला. आज सकाळी राष्ट्रपती भवनात त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आलं. जॉन्सन यांनी राजघाटालाही भेट दिली आणि महात्मा गांधींच्या समाधीला पुष्पहार अर्पण केला.

ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. भारत आणि ब्रिटनमधील नातेसंबंध आणि मैत्री आजच्यासारखे चांगले किंवा मजबूत याआधी कधीच नव्हते असे बोरिस जॉन्सन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं.

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image