पाकिस्तानची संसद विसर्जित करण्यात आल्यामुळे प्रधानमंत्री इम्रान खान यांना त्यांच्या पदावरुन हटवलं

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानची संसद विसर्जित झाल्यावर प्रधानमंत्री इम्रान खान यांना काल त्यांच्या पदावरुन हटवण्यात आलं. उपसभापती कासीम सुरी यांनी अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर इम्रान खान यांच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती अरीफ अल्वी यांनी संसद विसर्जित केली. पाकिस्तानच्या घटनेतल्या कलम 224 नुसार हंगामी प्रधानमंत्री नियुक्त होईपर्यंत इम्रान खान 15 दिवस या पदावर काम करू शकतील. मात्र लोकनियुक्त सरकारच्या प्रमुखाचे निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार त्यांच्याकडे राहणार नाहीत. पाकिस्तानची संसद विसर्जित झाल्यामुळे  प्रधानमंत्री पद आणि विरोधी पक्षनेते पद रिकामं आहे. त्यामुळे हंगामी प्रधानमंत्र्यांच्या नियुक्तीबाबत अद्याप अनिश्चितता आहे.