भारतीयत्व हीच सर्व भारतीयांची एक जात असून सेवाधर्म हा एकमेव धर्म - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीयत्व हीच सर्व भारतीयांची एक जात असून सेवाधर्म हा एकमेव धर्म आहे, देशातली तीर्थक्षेत्र ही केवळ अध्यात्मिक केंद्र नव्हेत तर एक भारत श्रेष्ठ भारत या मूलमंत्राचे प्रतीक आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

केरळमधल्या  शिवगिरी तीर्थक्षेत्राचा ९० वा वर्धापन दिन आणि ब्रह्म विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. देशाचा सांस्कृतिक वारसा आणि मूल्य व्यवस्थेत अनमोल योगदान देणारे  श्री नारायण गुरु हे भारताचे आध्यात्मिक पथदर्शक आहेत,श्री नारायण गुरु यांची जन्मभूमी असल्यानं केरळ एक पवित्र भूमी म्हणून ओळखली जाते, शिवगिरी मठाने आरोग्य सेवा, शिक्षण आणि जनसेवा अशा विविध क्षेत्रात श्री नारायण गुरु यांची शिकवण आणि वारसा कायम ठेवला आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.