राष्ट्रपती ७ दिवसाच्या परदेशी दौऱ्यावर

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या ७ दिवसाच्या परदेश दौऱ्यात आज नेदरलँड इथं पोचतील. भारत आणि नेदरलँड मधल्या राजनैतीक संबंधांचं हे ७५ वं वर्ष असल्यामुळे राष्ट्रपतींचा दौरा विशेष महत्वाचा आहे. दोन्ही देशांचे लोकशाही, न्यायशासन याबाबतचे आदर्श सामान आहेत. दोन्ही देश जल व्यवस्थापन , कृषी आणि अन्न प्रक्रिया , आरोग्यसेवा, शहरी निकड आणि स्मार्ट शहरं, अक्षय ऊर्जा, अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि दहशतवादाचा मुकाबला या मुद्द्यावर दोन्ही देश परस्पर सहकार्य करत आहेत.