जनहिताच्या योजना राबवून सामान्य जनतेला दिलासा द्या - उद्धव ठाकरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : जनहिताच्या योजना राबवून विविध जिल्ह्यातल्या पायाभूत सुविधा उभारण्याची कामं तातडीनं मार्गी लावत सामान्य जनतेला दिलासा द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातले सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि स्थानिक पातळीवरच्या इतर अधिकाऱ्यांशी दूरदर्शन प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या संवादाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी राज्यात प्राधान्यानं  करावयाची कामं आणि योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी पावसाळ्यापूर्वी कराव्या लागणाऱ्या तयारीचा तसंच इतर विकास कार्यांचा आढावाही घेतला.