राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचे प्रयत्न हाणून पाडण्याची दिलीप वळसे-पाटील यांची ग्वाही

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे, मात्र हे आम्ही कदापिही होऊ देणार नाही, अशी ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यांवर पोलीसांनी केलेली कारवाई कायद्यानुसार असून कोठडीत नवनीत राणा यांना कोणतीही हीन दर्जाची वागणूक दिली गेलेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या औरंगाबादमधल्या नियोजित सभेसंदर्भात येत्या २ दिवसात औरंगाबादचे पोलीस आयुक्त, परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पोलीस महासंचालकांशी चर्चा करून निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीला अस्थिर करण्यासाठी विरोधी पक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही गृहमंत्र्यांनी केला. 

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image