भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे परराष्ट्रमंत्री सरजेई लावरोव्ह यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे परराष्ट्रमंत्री सरजेई लावरोव्ह यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. युक्रेनप्रश्नी सुरु असलेल्या शांतीचर्चेसह एकंदर युक्रेनस्थितीबाबत त्यांनी प्रधानमंत्र्यांना माहिती दिली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी, हिंसाचार लवकरात लवकर थांबला पाहिजे, ही आपली भूमिका पुन्हा एकदा मांडली. तसंच शांततेसाठी सुरु असलेल्या प्रयत्नांमधे कोणत्याही प्रकारचं योगदान देण्यासाठी भारत तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. डिसेंबर महिन्यात झालेल्या भारत-रशिया द्विपक्षीय बैठकीतल्या निर्णयांबाबत सुरु असलेल्या प्रगतीविषयीही लावरोव्ह यांनी मोदी यांना माहिती दिली.