लसीकरणचा 186 कोटी मात्रांचा टप्पा पार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १८६ कोटी मात्रांचा टप्पा आज ओलांडला. आज सकाळपासून ४ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १८६ कोटी १ लाखाच्या वर गेली. त्यात ८४ कोटी २ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन, तर २ कोटी ३५ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ९ कोटी ७७ लाखापेक्षा जास्त, तर १२ ते १४ या वयोगटातल्या लाभार्थ्यांना २ कोटी ३३ लाखापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. राज्यात आज सकाळपासून २२ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १६ कोटी २८ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ७ कोटी १० लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा, तर १९ लाख ७७ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ६३ लाख ६३ हजारापेक्षा जास्त, तर १२ ते १४ या वयोगटातल्या लाभार्थ्यांना १७ लाख ९७ हजारापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image