शीख समाजाच्या नववर्ष दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीख समाजाच्या नववर्षदिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. वाहेगुरु सर्वांना आरोग्य आणि समृद्धीचं वरदान देतील, त्यांची शिकवण आपल्या तेजाने साऱ्या जगाला उजळत राहील असं मोदी यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

गोंदियाच्या बिर्शी विमानतळावरून तब्ब्ल ७९ वर्षांनंतर काल प्रवासी वाहतूक विमान सेवेला प्रारंभ झाला. नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य सिंदिया यांनी इंदूर विमानतळावरुन गोंदियासाठीच्या विमानसेवेचं उद्घाटन केलं. गोंदिया विमानतळावरुन पहिलं विमान हैदराबादसाठी रवाना झालं. खासदार सुनील मेंढे यांनी त्याला हिरवा झेंडा दाखवला.

गोंदिया शहराला लागून असेलल्या बिर्शी गावात ब्रिटिश सरकारनं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९४२-४३ साली विमानतळ उभारला होता. मात्र स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी विमानतळाची पूर्णतः नासधूस झाली. २००५ मध्ये तत्कालीन नागरी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकारानं या विमानतळाचं पुनरुज्जीवन झालं आणि तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ उभा राहिला. नियमित विमानसेवेचा लाभ शेजारच्या मध्यप्रदेश, आणि छत्तीसगड या राज्यातल्या प्रवाशांना सुद्धा होणार आहे.