युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची पोलंडला भेट


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी काल युक्रेन सीमेपासून तासभरच्या अंतरावर असलेल्या पोलंडमधल्या जेशो शहराला भेट दिली. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या रशियाच्या हल्ल्यांच्या पार्श्र्वभूमीवर पूर्व युरोपातल्या त्याच्या शेजारी देशांना प्रतीकात्मक पाठिंबा दर्शवण्यासाठी बायडन यांनी जेशो शहराला ही भेट दिली.या भेटीवेळी बायडेन यांनी पूर्व युरोपात नाटोच्या सहाय्यासाठी गेलेल्या अमेरिकेच्या सैन्य तुकड्यांसोबत चर्चा केली, तसंच त्यांनी पोलंडमध्ये तात्पुरत्या आश्रयासाठी आलेल्या लाखो युक्रेनी निर्वासितांच्या मदतीसाठी करण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचा प्रत्यक्ष आढावाही घेतला. याशिवाय त्याठिकाणी युक्रेनी निर्वासितांच्या मदतीत व्यस्त असलेल्या मानवतावादी कार्यकर्त्यांना भेटून बायडन यांनी पोलंडमध्ये सुरू असलेल्या या कार्याला आपला पाठिंबा व्यक्त केला. अध्यक्ष बायडन आज वॉर्सा इथं पोलंडचे अध्यक्ष आंद्रेझ दुदा यांच्यासह इतरांसोबत पुढील चर्चा करणार आहेत. 

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image