मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधे उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधे उष्णतेची तीव्र आणि दीर्घ लाट येण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. या परिसरात कालपासूनच तापमानात वाढ होऊ लागली ती आजही कायम राहील असा अंदाज आहे. गेले काही दिवस तापमान ३९ अंश सेल्सियसच्या आसपास असून सरासरी तापमानापेक्षा ते ६ अंशांनी जास्त आहे. या काळात दुपारी १२ ते ३ या वेळात उन्हात जाणं टाळावं तसंच शरीराचं तापमान आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीनं पुरेशा प्रमाणात पाणी आणि द्रवरुप पदार्थांचं सेवन करावं असा सल्ला हवामान विभागानं दिला आहे.