बृहन्मुंबई हद्दीत येत्या ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई हद्दीत शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील अधिकारानुसार पोलीस उपायुक्तांनी बृहन्मुंबई हद्दीत येत्या ८ एप्रिल पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणं, मोर्चा काढणं, ध्वनीवर्धक, बँड, फटाके यांना मनाई आहे. विवाह समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, संघटनांच्या वैधानिक बैठका, क्लबमधल्या कार्यक्रमांना बंदी आदेशातून वगळलं आहे. चित्रपटगृहं, नाट्यगृहं तसंच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणं, न्यायालयं, शासकीय, निमशासकीय कार्यालयं, शाळा, महाविद्यालयं, कारखाने, दुकानं या ठिकाणी सकारण होणाऱ्या जमावाला यातून वगळलं आहे.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image