दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारताची श्रीलंकेवर १४३ धावांची आघाडी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळूरू इथं सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात,आज भोजनापर्यंत, भारतानं आपल्या दुसऱ्या डावात ५ गडी बाद १९९ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताची आघाडी ३४२ धावांवर पोचली आहे. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा पहिला डाव केवळ १०९ धावांत आटोपला. श्रीलंकेला कालच्या ६ गडी बाद ८६ या धावसंख्येत केवळ २३ धावांचीच भर घातला आली. यामुळे पहिल्या डावात भारताला श्रीलंकेवर १४३ धावांची आघाडी घेतली. जसप्रीत बुमराह यानं पहिल्या डावात श्रीलंकेचे ५ गडी बाद केले. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतानं सावध सुरु केली. मात्र चांगल्या सुरुवातीनंतरही आघाडीच्या फलंदाजांना खेळपट्टीवर जम बसवता आला नाही. कर्णधार रोहीत शर्माचं अर्धशतक ४ धावांनी हुकलं, तर ऋषभ पंत वेगवान ५० धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात ५ गडी बाद २०३ धावा केल्या होत्या.