निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी केंद्रीय आरोग्य योजनेअंतर्गत ओपीडी जारी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी केंद्रीय आरोग्य योजनेअंतर्गत ओपीडी अर्थात बाह्यरुग्ण सुविधा किंवा वैद्यकीय भत्त्याच्या माध्यमातून एक निश्चित रक्कम मिळवण्यासाठी सरकारनं सुचना जारी केल्या आहेत. दोन्हीपैकी एक सुविधा प्राप्त करता येईल. केंद्रीय आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि वैद्यकीय भत्ता बंद करण्यासाठी निवृत्तीवेतनधारक किंवा त्यांच्या कुटुंबियांना बँकेत अर्ज करता येईल. त्यानंतर बँक वैद्यकीय भत्ता बंद करुन एक प्रमाण देईल.

त्यानुसार निवृत्तीवेतनधारकांना केंद्रीय आरोग्य योजनेअंतर्गत आंशिक रक्कम भरुन या योजनेसाठीच्या कार्डसाठी अर्ज करता येईल. दरम्यान जे निवृत्तीवेतनधारक केंद्रीय आरोग्य योजनेच्या कक्षेत येत नाहीत त्यांना वैद्यकीय भत्त मिळवण्याचा पर्याय खुला असेल असं कामगार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.