वीज मंडळाच्या अधिकाऱ्याला धमकी देणं आणि अभद्र भाषा वापरणं खपवून घेणार नाही - ऊर्जामंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : वीज मंडळाच्या अधिकाऱ्याला धमकी देणं आणि अभद्र भाषा वापरणं खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी तसंच वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल डॉ. राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याविषयी सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश औरंगाबादमधल्या महावितरणच्या सह व्यवस्थापकीय संचालकांना दिल्याचं राऊत यांनी सांगितलं.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image