युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही- अमित देशमुख

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधून राज्यात परतलेल्या २५० विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमासाठी उपाययोजना तसंच त्यांना भारतीय विद्यापीठांत सामावून घेण्यासंदर्भात धोरण निश्चित केलं जाणार आहे. अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली. या विद्यर्थ्यांबाबत काल विधानभवनमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ माधुरी कानिटकर, रशिया एज्युकेशनचे उपाध्यक्ष, लिंकन अमेरिकन विद्यापीठाचे कुलगुरू, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे डॉ. एस एस उत्तुरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कुलगुरुंच्या अभ्यासगटांची व्याप्ती वाढवून सकारात्मक दृष्टीनं सर्व बाबींची तपासणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. रशिया आणि युक्रेन देशाशेजारील ७ ते ८ देशांतही अभ्यासक्रम सारखाच असल्याने इतर देशांसोबत सामंजस्याने या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल का याबाबत चर्चा करण्याचा प्रस्ताव केंद्राला सादर करण्यात येईल. भारतात पुन्हा येणाऱ्या विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षा द्यायला मानसिकरित्या तयार करावं लागेल. याचबरोबर ऑनलाईन पद्धतीनं युक्रेन शासन शिक्षण देईल का यासंदर्भातही विचार करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Popular posts
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित
Image
एसटीच्या प्रवाशांना स्वस्त दरात “नाथजल” या शुद्ध पेयजल योजनेचं लोकार्पण
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती, भक्ती शक्ती शिल्प निगडी येथे मोठ्या उत्साहात साजरी
Image
गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
Image