परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून प्रधानमंत्री उद्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी साधणार संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअमवर  परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांबरोबर संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा पाचवा भाग आहे.

या कार्यक्रमात परीक्षेमुळे उद्भवणाऱ्या तणावाशी संबंधीत प्रश्नांना प्रधानमंत्री त्यांच्या परिचित अंदाजात उत्तरं देतील. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर केलं जाईल. यावेळी पालक आणि शिक्षकांनाही प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळेल. यंदाच्या कार्यक्रमात १५ लाखापेक्षा जास्त विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी नोंदणी केली आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे या कार्यक्रमाचं आयोजन दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं होतं.