भारतरत्न लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज यांच्यासह दिवंगत सदस्यांना विधान परिषदेत श्रद्धांजली

  विधान परिषद प्रश्नोत्तरे :

मुंबई : ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकरउद्योगपती राहुल बजाज यांच्यासह विधान परिषदेच्या माजी दिवंगत सदस्यांना आज शोकप्रस्ताव मांडून श्रद्धांजली वाहण्यात आली. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिवंगत सदस्यांच्या कार्याचा उल्लेख करून समाज आणि देशाच्या विकासात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला.

भारतरत्न लता मंगेशकरउद्योगपती राहुल बजाजरामनिवास सिंहएन.डी. पाटीलसुधीर जोशीदत्तात्रय लंकेसंजीवनी हरी रायकरआशाताई टालेकुमुद महादेव रांगणेकर यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी समाज आणि राष्ट्राच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव केला.  शोक प्रस्तावानंतर सभागृहातील सर्व सदस्यांनी दिवंगत सदस्यांना उभे राहून श्रद्धांजली वाहिली.