ऑपरेशन गंगा अंतर्गत 10 हजारहून अधिक विद्यार्थी मायदेशी परतले

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर, सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी त्यांना पश्चिम सीमेवर आणण्याकरता भारतीय दूतावासाची एक तुकडी पोल्टावा शहरात तैनात करण्यात आली आहे.

युक्रेनमधील भारतीय नागरिकांनी गुगल फॉर्ममध्ये त्यांचे तपशील भरावेत असं आवाहन दूतावासानं केलं आहे. दरम्यान, युक्रेनमधील पिसोचिन इथून बाहेर पडलेल्या 44 भारतीयांचा एक गट लिवहून पोलंडच्या सीमेकडं रवाना झाला आहे तर 150 हून अधिक जण रोमानियन सीमेकडे मार्गस्थ झाले आहेत. 

सुमी शहरातून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठीच्या प्रयत्नात कोणतीही कसूर केली जाणार नाही, मात्र विद्यार्थ्यांनी आणखी काही तास तरी धीर धरावा, असं कीवमधील भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.

ऑपरेशन गंगा अंतर्गत गेल्या आठवड्यात, दहा हजारहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. खार्किव आणि सुमी वगळता, युक्रेनच्या उर्वरित भागातील जवळजवळ सर्व भारतीयांना बाहेर काढण्यात आलं आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image