मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १ हजार ७४७ अंकांनी कोसळला

 


मुंबई (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात विक्रीचा जोर राहिल्यानं मुंबई शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १ हजार ७४७ अंकांनी घसरला आणि ५६ हजार ४०६ अंकांवर बंद झाला. जागतिक बाजारातल्या अस्थिर वातावरणात तेलाच्या भावानं आज गेल्या ७ वर्षांतला उच्चांक नोंदवला. या घडामोडींचे  नकारात्मक पडसाद आज बाजारात उमटल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. वाहन उद्योग, बँकिंग, तेल आणि वायू, औषध कंपन्या, धातू, बांधकाम, भांडवली वस्तू क्षेत्रासह सर्व महत्वाच्या क्षेत्रांचे  समभाग आज तोट्यात दिसून आले.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज ५३२ अंकांनी घसरला आणि १६ हजार ८४३ अंकांवर बंद झाला. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image