देशात खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं साठा मर्यादा वाढवली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं साठा मर्यादा वाढवली आहे. त्यानुसार किरकोळ विक्रेत्यांसाठी 30 क्विंटल, घाऊक विक्रेत्यांसाठी 500 क्विंटल, मोठ्या ग्राहकांच्या किरकोळ दुकानांसाठी 30 क्विंटल म्हणजेच मोठ्या साखळी विक्रेते आणि दुकानं आणि त्याच्या आगारांसाठी 1 हजार क्विंटल अशी साठा मर्यादा निश्चित केली आहे. खाद्यतेलावर प्रक्रीया करणारे त्यांच्या साठवण क्षमतेच्या ९० दिवसांचा साठा करू शकतील. या संदर्भात केंद्र सरकारनं या महिन्याच्या 3 फेब्रुवारीला सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांबरोबर एक बैठक आयोजित केली होती, त्यानुसार केंद्र सरकारनं काल हे नियम जारी केले. नवीन साठा मर्यादा 30 जून, 2022 पर्यंत लागू असेल.