पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी दलजीत सिंग बल यांला अटक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह पीएमसी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि बँकेचे माजी संचालक दलजीत सिंग बल यांना काल बिहारमधील रक्सौल इथं भारत-नेपाळ सीमेजवळ अटक करण्यात आली. आरोपी नेपाळच्या मार्गानं पळून जाण्याचा विचार करत होता,असं पूर्व चंपारणचे पोलीस अधीक्षक कुमार आशिष यांनी सांगितलं. पीएमसी बँकेचे माजी संचालक दलजीत सिंग बल हे ६ हजार ७०० कोटी रुपयांच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे मुख्य आरोपी आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दिलेल्या माहितीनंतर आरोपीला रक्सौलच्या इंटिग्रेटेड चेक पोस्ट  इथं अटक करण्यात आली,असं पोलिस अधीक्षकांनी सांगितलं. दलजीत सिंग बल याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image