सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारे यांनी जाहीर केलेले आंदोलन स्थगित 

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री संदर्भातल्या निर्णयाविरोधात  होणारं आंदोलन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्थगित केलं आहे. या निर्णयाला अण्णांनी विरोध केला होता. तसंच हा निर्णय मागे घ्यावा यासाठी त्यांनी 14 फेब्रवारीपासून आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाच्या सचिव वल्सा नायर यांनी अण्णा यांची भेट घेऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर अण्णा हजारे यांनी आंदोलन स्थगित केल्याचं जाहीर केलं.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image