युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी हंगेरीतल्या भारतीय दूतावासाचं एक पथक सीमावर्ती भागात रवाना

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशिया - युक्रेन युद्ध तसंच युक्रेनचं बंद झालेले हवाई क्षेत्र यामुळे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठीच्या विविध पर्यायांचा सरकार विचार करत आहे. हे पर्याय पडताळण्यासाठी हंगेरीतल्या भारतीय दूतावासाचं एक पथक सीमावर्ती भागात रवाना झालं असून भारतीयांना माघारी आणण्यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. परराष्ट्र मंत्रालयानं पोलंड, स्लोव्हाक गणराज्य आणि रोमानिया या देशांना लागून असलेल्या युक्रेनच्या सीमा भागातही आपली पथकं पाठवली आहेत. भारतीयांनी या पथकाशी संपर्क साधावा अश्या सूचना परराष्ट्र मंत्रालयानं दिल्या आहेत. संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सद्य परिस्थितीत युक्रेनमध्ये सुमारे २० हजार भारतीय अडकलेले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तातडीनं उपाय योजना करत आहे, असं भारताचे युक्रेन मधले राजदूत पार्थ सत्पथी यांनी म्हटलं आहे. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image