मुंबई शेअऱ बाजारात आजही तेजी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारांमधले सकारात्मक कल पाहता देशांतर्गत बाजारातही आज गुंतवणूकदारांमधे खरेदीचा उत्साह दिसला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत आज दिवस अखेर ६५७ अंकांची वाढ झाली आणि तो ५८ हजार ४६६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १९७ अंकांची वाढ नोंदवत १७ हजार ४६४ अंकांवर बंद झाला. तेल आणि वायू क्षेत्रातल्या काही कंपन्या वगळता इतर सर्व क्षेत्रांमधले, विशेषतः वाहनं, ग्राहकोपयोगी वस्तू, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि धातू क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग आज तेजीत राहिले.