मराठीला ‘अभिजात’ दर्जाच्या मागणीसाठी ४ हजार पोस्ट कार्ड मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडे रवाना

 

मुंबई : मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी असलेली ४ हजार पोस्ट कार्ड आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडे रवाना करण्यात आली. याप्रसंगी वर्षा शासकीय निवासस्थानी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली एक जन अभियान सुरू करण्यात आले आहे. हा ‘अभिजात’ दर्जा २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी भाषा दिवस आहे त्याआधी मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते सुमारे ४ हजार पोस्ट कार्ड महामहीम राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना पाठविण्यात आली. हा पोस्ट कार्डचा दुसरा संच आहे, याआधीसुद्धा एक संच राष्ट्रपती महोदयांना पाठविण्यात आला आहे.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image