मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 

आचार्य जांभेकर यांचा परखड बाणा पत्रकारितेसाठी मार्गदर्शक

मुंबई : आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आचार्य जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

मराठी पत्रकारितेला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा ध्येयवादी वारसा लाभला आहे. त्यांचा निष्पक्ष आणि परखड असा बाणा होता. अनेकविध विषयांचा गाढा अभ्यास आणि जनहितासाठीचे लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आजच्या आधुनिक पत्रकारितेसाठी देखील मार्गदर्शक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image