निवडणूक आयोगाने ११ फेब्रुवारीपर्यंत वाढवली थेट प्रचार आणि रोड शोवरील बंदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगानं थेट प्रचार आणि रोड शोवरील बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. पाच राज्यातील निवडणुकीच्या दरम्यान कोविड महामारी संदर्भातल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, आयोगानं राजकीय पक्षांच्या किंवा उमेदवारांना जास्तीत जास्त एक हजार किंवा ५० व्यक्तींसह मोकळ्या जागांवर प्रत्यक्ष सार्वजनिक सभा घ्यायला परवानगी दिली आहे. आयोगानं घरोघरी प्रचाराची मर्यादा १० ते २० व्यक्तींवरून वाढवली आहे आणि जास्तीत जास्त ५०० व्यक्तींच्या अथवा सभागृहाच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांच्या बंदीस्त जागेतील  बैठकांसाठी मर्यादा वाढवली आहे.


Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image