मॉकड्रील अपघातात निधन पावलेले सदाशिव कार्वे यांच्या पार्थिवर किशोरी पेडणेकर यांनी वाहिली श्रद्धांजली

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतील माटुंगा इथे गेल्या आठवडयात मॉकड्रील दरम्यान झालेल्या अपघातात निधन पावलेले सदाशिव कार्वे यांच्या पार्थिवाचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज अंत्यदर्शन घेतले तसेच मुंबईकरांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या अपघातात तीन जवान जखमी झाले होते. त्यातील गंभीर जखमी सदाशिव कार्वे यांच काल निधन झाले. भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात आज त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या वतीने मानवंदना देणयात आली. कार्वे यांना या अपघातात आपला पाय गमवावा लागला होता. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु त्यांची काल प्राणज्योत मालवली. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांनी उपप्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांना यापूर्वीच दिले आहेत.

 

 

 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image