आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त उपराष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जीवनात मातृभाषेचं स्थान अनन्यसाधारण असून आपण सर्वांनी आपापली मातृभाषा जतन करण्यासाठी मातृभाषेतून अधिकाधिक संवाद साधण्याचा संकल्प करुया असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. प्रत्येकाला मातृभाषेचा अभिमान असला पाहिजे आणि तिचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे सोपवला पाहिजे असं ही नायडू यांनी म्हटलं आहे.