मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात चौघे ठार, तीन जण जखमी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात आज झालेल्या अपघातात चारजण जागीच ठार झाले, तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमधले तिघे सोलापूर जिल्ह्यातले तर एक जण तुळजापूरचा आहे. जखमी जालन्यातले आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सकाळी साडे सहाच्या सुमाराला हा अपघात झाला. एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्यानं सहा- सात वाहनं एकमेकांना धडकली. यात दोन मोठ्या वाहनांच्या मध्ये चिरडल्या गेलेल्या कारमधले चौघेही जागीच ठार झाले. अपघातानंतर महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती, ती आता पूर्ववत झाली आहे.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image