मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्याच्या निर्णयाला मंजुरी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्याच्या निर्णयाला आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालिकेची मुदत ७ मार्चला संपणार आहे. कोरोनाची रुग्णसंख्या, वाढलेली सदस्य संख्या आणि प्रभागांची पुनर्रचना यामुळं ७ मार्च पूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं शक्य होणार नसल्यानं प्रशासकाची नियुक्ती करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगानं केली होती. त्यासाठी ही सुधारणा केली जाणार आहे. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या आर्थिक निकषात वाढ करण्याचा निर्णयही आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. १५०० पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असलेल्या भागात 75 लाख रुपयांपर्यंतची कामे ५ वर्षांपर्यंत करता येतील.