रशियानं युक्रेनमधील लष्करी कारवाई थांबवावी यासाठी आज संयुक्तराष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मतदान

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधील लष्करी कारवाई रशियानं तात्काळ थांबवून विनाशर्त सैन्य मागे घ्यावं, यासाठी आज संयुक्तराष्ट्र सुरक्षा परिषदेत मतदान घेतलं जाईल. अमेरिकेनं मतदानासंदर्भातला मसुदा तयार केला आहे. संयुक्तराष्ट्राच्या आमसभेत या मसुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रसंघात रशियाकडं सुद्धा नकाराधिकार आहे. या प्रकरणात युरोपियन युनियनने रशियावर आर्थिक, व्हिसा, ऊर्जा क्षेत्रात कडक निर्बंध लावले आहेत,पण रशियातून आयात होणाऱ्या गॅसचा समावेश या निर्बंधात नाही. ऊर्जा क्षेत्रातलं रशियावरचं अवलंबित्त्व कमी करण्यासाठी लवकरच मार्ग शोधले जातील, असं युरोपियन आयोगानं सांगितलं. युक्रेनला ३३६ दशलक्ष डॉलर्स आणि शस्त्रास्त्रांची मदत केली जाईल असं फ्रान्सच्या अध्यक्षांनी जाहीर केलं.