मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी जन अभियान – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

 

मुंबई : मराठी भाषा दिनापूर्वी (२७ फेब्रुवारी) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी जनरेटा लावून धरण्याचे आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत केले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने विविध उपक्रम राबविले आहेत. नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात शांतता ‘मराठीचे कोर्ट चालु आहे’ हा लघुपट दाखविला, त्याचप्रमाणे प्राचिन पुरावे सांगणारे प्रदर्शन भरविण्यात आले. महामहिम राष्ट्रपतींना  यासंदर्भात सुमारे २५ हजार पत्रे पाठविण्यात आली आहेत. दरम्यान, येत्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन असून त्यापूर्वी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी साहित्यिक रंगनाथ पठारे, भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणी आदी उपस्थित होते.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image