जयप्रभा स्टुडिओ कार्यरत राहावा यासाठी मराठी चित्रपट महामंडळाकडून साखळी उपोषण



मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूरातल्या जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीला विरोध करत, हा स्टुडिओ कार्यरत राहावा या मागणीसाठी मराठी चित्रपट महामंडळानं काल पासून साखळी उपोषण सुरु केलं. या उपोषण आंदोलनाला अनेक कलाकार, तंत्रज्ञ आणि सामान्य नागरिकांनीही पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत या स्टुडिओत चित्रीकरणाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण आंदोलन सुरूच सहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.