अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी २० देशांच्या अर्थमंत्र्यांच्या आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांच्या बैठकीत सहभागी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जी २० देशांच्या अर्थमंत्र्यांच्या आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांच्या बैठकीत सहभाग नोंदवला. सध्याची जागतिक आर्थिक परिस्थिती आणि २०२२ या वर्षासाठी जी २० देशांचा प्राधान्यक्रम यावर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत त्यांनी जागतिक आर्थिक परिस्थिती, महागाईचा धोका, पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी आणि कोरोनाचे नवे उपप्रकार यावर मत व्यक्त केली. अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोना लशींचं समान आणि जलद वितरण करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

 

 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image