वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांची खराब सुरुवात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची खराब सुरुवात झाली. ५० धावांच्या भारताचे सलामीवीर तंबूत परतले होते. रोहित शर्मा ५ तर रिषभ पंत आणि विराट कोहली प्रत्येकी १८ धावा काढून बाद झाले. ओडियन स्मिथनं १२ व्या षटकात रिषभ पंत आणि विराट कोहलीचे बळी टिपले. या सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. सध्या के. एल. राहुल आणि सुर्यकुमार यादव खेळत आहेत. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या २८.१ षटकात ३ बाद १२३ धावा झाल्या होत्या.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image