राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याच्या वृत्ताचं MPSC कडून खंडन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरात आज MPSC कडून राज्यसेवा पूर्व परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परीक्षेचा पेपर नागपूरमध्ये फुटल्याची चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरू आहे. मात्र MPSC नं या वृत्ताचं खंडन केलं आहे. अशी कुठलीही घटना घडलेली नसल्याचं MPSC नं ट्विटरवर म्हटलं आहे.राज्यसेवा पूर्व परीक्षा आज अमरावती जिल्ह्यात यशस्वीरित्या पार पडली. ३० केंद्रांवर आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेला ८७०० विद्यार्थी बसले होते.  ही परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली असून ती शांततेत  पार पडल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी आशिष कुमार बिजवल यांनी दिली आहे. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image