देशात सोमवारी कोरोनाच्या १ लाख ६८ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोवीड लसीकरण मोहिमे अंतर्गत १५२ कोटी ८९ लाखापेक्षा जास्त लसमत्रा देण्यात आल्या. देशात सध्या ८ लाख २१ हजारापेक्षा जास्त कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्के इतका आहे. देशात काल अंदाजे ७० हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यानं या आजारातून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी ४५ लाखावर पोहोचली. देशात काल कोरोनाच्या १ लाख ६८ हजाराहून जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली.