केपटाऊन कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारताविरूद्ध पहिला डाव सुरू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केपटाऊन कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं भारताविरूद्ध आपला पहिला डाव पुढे सुरू केला आहे. मालिकेतल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात कालच्या एक बाद १७ धावसंख्येवरून दक्षिण आफ्रिकेनं खेळायला सुरूवात केली. कालचा दिवस संपला तेव्हा एडन मारक्रम ८ तर केशव महाराज ६ धावांवर खेळत होते. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव २२३ धावांवर आटोपला.