भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

  भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई : भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात,  “भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांचा ‘जय जवान जय किसान’ चा नारा भारताला बलशाली बनवणारा आहे. शेतकरी बांधव आणि भारतमातेची सेवा करणाऱ्या जवानांसाठी तळमळीने कार्य करणारे ते थोर नेते होते. भारतातील सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी त्यांनी प्रयत्न केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन त्यांनी प्रधानमंत्री पदापर्यंत प्रवास केला. परंतु त्यांची साधी राहणी कायम होती. त्यांचे असामान्य व्यक्तिमत्त्व युवा पिढीला प्रेरणा देणारे आहे. स्मृतिदिनानिमित्त स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन.”

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image