प्रधानमंत्री येत्या १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सवाचं करणार उदघाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १२ जानेवारीला, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उदघाटन करणार आहेत. या महोत्सवात देशवासीयांनी हिरिरीनं सहभागी व्हावं, असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विटरद्वारे केलं आहे. Pmevents.ncog.gov.in या वेबसाइटवर यासाठी नोंदणी करता येईल. आतापर्यंत २० हजाराहून अधिक नागरिकांनी यासाठी नोंदणी केली आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रधानमंत्री भाषण करणार असून, त्याकरता देशभरातल्या युवकांनी आपापल्या सूचना आणि अभिनव कल्पना मांडाव्यात, असं  ठाकूर यांनी सुचवलं आहे.