मुंबईच्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत सतत तीन दिवस कोरोनाची रूग्ण संख्या २० हजाराच्या आसपास आढळत होती. मात्र आता ही रूग्ण संख्या घटू लागली आहे. मुंबईत काल ११ हजार ६४७ नवे रुग्ण आढळले. तर त्यापेक्षा जास्त म्हणजे १४ हजार ९८० रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल आढळलेल्या रुग्णांपैकी ९ हजार ६६७, म्हणजे ८३ टक्के रुग्णांमधे लक्षणं नाहीत. ८५१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ८७ टक्के असून, कोरोना रुग्णवाढीचा दर १ पूर्णांक ८७ शतांश टक्के असा आहे. रुग्णदुपटीचा कालावधी ३६ दिवस असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
अमेरिकेत मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी म्हणून जाहीर
Image
भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Image
नैसर्गिक शेतीमुळे कृषी क्षेत्रात कायापालट घडून येईल, असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विश्वास
Image
सरकारी तपास यंत्रणांनी बजावलेल्या समन्सला संसद सदस्य टाळू शकत नाहीत- सभापती एम. व्यंकय्या नायडू
Image