देशातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री संध्याकाळी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला कोविड १९ चा वाढता संसर्ग पाहता, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी साडे चार वाजता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या बैठकीत ते देशातली कोविडची सद्यस्थिती आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. प्रधानमंत्र्यांनी गेल्या रविवारी कोविड १९ च्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. देशातली आरोग्य सज्जता, लसीकरण मोहिमेची गती आणि ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा आरोग्यावर होत असलेला परिणाम या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्हा पातळीवर आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करून संबंधित अधिकाऱ्यांनी राज्य सरकारांशी समन्वय साधून कार्य करावं, अशी सूचना प्रधानमंत्र्यांनी या बैठकीत केली होती.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image