परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा पाचवा भाग फेब्रुवारी महिन्यात होणार असून त्यासाठी नावनोंदणी करण्याचा आज शेवटचा दिवस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा पाचवा भाग फेब्रुवारी महिन्यात होणार असून त्यासाठी नावनोंदणी करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेत इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक भाग घेऊ शकतात. या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांची निवड करण्याकरता एक ऑनलाइन लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून उमेदवार संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध असलेले आपल्या आवडीचे विषय त्यासाठी निवडू शकतात. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची असून त्याद्वारे ते देश-विदेशातले विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतात.परीक्षांमुळे उद्भवणाऱ्या ताण तणावावर मात करून सहजपणे अभ्यास कसा करता येईल, यावर या कार्यक्रमात चर्चा केली जाते.